दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत भयानक झाली आहे. ऐन दिवाळीत दिल्लीत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. शाळा, कॉलेज बंद ठेवण्यासह कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रदूषणासंदर्भात राज्य सरकारची अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक बनत आहे. यामुळे सराकारने तातडीने काही निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.
दिल्ली-एनसीआरमधील सर्वात चिंताजनक परिस्थिती नोएडामध्ये आहे. सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 616 इतका नोंदवला गेला. वाढत्या प्रदूषणाची पातळी विचारात घेता कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचा चौथा टप्पा अर्थात GRAP दिल्ली-NCR मध्ये लागू केला आहे.
शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश
मागील दोन दिवसांत दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, फरीदाबादसह एनसीआरच्या सर्व भागात प्रदूषणाची पातळी अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे. विषारी हवेमुळे दिल्ली एनसीआरमधील लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. डोळ्यात जळजळ होणे आणि घसा खवखवणे अशा तक्रारींचा सामना करावा लागत आहे. नारीकांच्या आरोग्याचा गांभीर्गायाने विचार करत सरकारने लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. 10 नोव्हेंबरपर्यंत शाळा तात्काळ बंद करण्याच्या आदेश जारी करण्यात आले आहेत. या कालावधीत शाळा प्रशासनाने ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवावे अशा सूचना केल्या आहेत. प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. तर 6 वी ते 12वीपर्यंतच्या शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग घेण्यात येणार आहेत. अनेक कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगावे असे देखील आदेश दिले आहेत. यासंदर्भात एक परित्रक दिल्ली सरकारने जारी केले आहे.









