देश
PM Narendra Modi Visit Shirdi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डीत घेतले साईबाबाचे दर्शन, सोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दाखवली उपस्थिती
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्य़ावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान शिर्डी येथे साईबाबाचे दर्शन घेतले आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शिर्डी साई बाबाच्या दर्शनासाठी उपस्थित आहे. यावेळी मोंदीच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली आहे, सुत्रांच्या माहितीनुसार, थोड्याच वेळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींजीचं भाषण सुरु होणार आहे. पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त लावला आहे. मोंदीचं भाषण ऐकण्यासाठी हजारो गावकरी उपस्थित झाले आहे.