देश

नाशिकमधील गिरणा नदीत सापडले कोट्यवधीचे ड्रग्ज, ललित पाटील प्रकरणात धक्कादायक खुलासा, संशय येऊ नये म्हणून…

ललित पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. ड्रग्जमाफिया ललित पाटीलबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. ललित पाटील याच्यावर कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप आहे. त्यातच आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिकच्या देवळामध्ये मोठा ड्रग्जचा साठा सापडला आहे. पोलिसांनी लोहणेरच्या गिरणा नदीपात्रातून 15 ड्रग्ज जप्त केले आहे. मुंबई पोलिस आणि देवळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शोध मोहिम आखली होती. यामध्येही ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा हात असल्याचे समोर येतेय.

देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळ असलेल्या गिरणा नदीत लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. ललित पाटील याच्या सहकाऱ्यानेच हे ड्रग्ज लपवून ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे. याचा शोध घेण्यासाठीच मुंबई पोलिस पुन्हा नाशिक जिल्ह्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ललित पाटिलचा सहकारी सचिन वाघ यानेच गिरणा नदीच्या पाण्यात ड्रग्स लपवले होते. देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीमध्ये कोट्यवधीच्या रुपयांचे ड्रग्स पॅकेट आढळून आले आहेत. पोलिसांनी स्कुबा ड्रायव्हिंग करणाऱ्या स्विमर्सचा वापर करुन आणि विविध सर्च टीमच्या सहाय्याने ड्रग्स नदीच्या पाण्यातून पुन्हा बाहेर काढले आहेत.

ललित पाटीलवर कारवाई झाल्यानंतर कारखान्यातील ड्रग्ज लपवून ठेवण्यासाठी सचिन वाघने नदीत ड्रग्ज लपवून ठेवले होते. मात्र, त्याची ही शक्कल फार काळ टिकली नाही. मुंबई पोलिसांनी शोध घेत याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी रात्रभर नदीपात्रात शोध घेत ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. सचिन वाघ हा ललित पाटीलचा मित्र असल्याचे चौकशीत समोर येत आहे.

ललित पाटीलला पोलिस कोठडी मिळाल्यानंतर पोलिस विविध अनुषंगाने तपास करत आहेत. ललित पाटीलने कमावलेला पैसा त्याने कुठे गुंतवला आहे तर आत्तापर्यंत ड्रग्ज तयार केले होते ते कुठे ठेवलं आहे, याचा शोधही पोलिस घेत आहेत. अलीकडेच पालघरमधील मोखाडा येथे ड्रग्जचा कारखाना असल्याचे समोर आले होते. सचिन वाघच्या माहितीनुसार, त्याने हे सगळे ड्रग्स नदीच्या पाण्यात फेकले होते. पुलावरुन त्याने नदीत फेकले होते. या नदीत पुरेशाप्रमाणात पाणी असते ती कधीच कोरडी होत नाही हे पाहून त्याने या नदीच्या पाण्यात ड्रग्ज फेकले. मुंबई पोलिस रात्रीपासून नदीच्या पाण्यात शोध घेत आहेत. पहाटेपर्यंत पोलिसांना मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले आहेत. तर, अद्यापही शोध मोहिम सुरू आहेत.

Related Articles

Back to top button