मुंबईहून जयपूरला जाणारे सुमारे 140 प्रवासी विमानतळावर अडकले, तांत्रिक त्रुटी असल्याचा विमानतळ प्राधिकरणाचा दावा
मुंबईहून जयपूरला जाणारे सुमारे 140 प्रवासी काही तांत्रिक कारणामुळे मुंबई विमानतळावर (Mumbai Airrport) लॉक झाले आहेत. एका प्रवाशाने दावा केला आहे की ते मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या एअर एशियाच्या सकाळी 6:15 च्या फ्लाइटमध्ये जाण्यासाठी आले होते पण अजूनही मुंबई विमानतळावर थांबून आहेत. प्रवाशांचा दावा आहे की ते विमान आणि विमानतळाच्या मध्यभागी असलेल्या पॅसेज वेमध्ये लॉक केले गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याचा विमानतळ प्राधिकरणाचा दावा आहे. परंतु ते कारण स्पष्ट करण्यास किंवा दुसर्या विमानाची व्यवस्था करण्यास तयार नाहीत.अनेक प्रवाशांच्या महत्त्वाच्या बैठका होत्या तर एकाला वडिलांच्या अंत्यविधीला हजर राहायचे होते. पण गेले पाच ते सहा तास विमानतळावर थांबावे लागले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या पावसाळ्यानंतर नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी आज बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. सकाळी 11 सायंकाळी पाच या वेळेत धावपट्टींची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे अंदाजित 350 अधिक विमानसेवांना फटका बसणार आहे.
सहा तास एकही विमान उडणार नाही
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आज सहा तासांसाठी तात्पुरतं बंद करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळ तात्पुरतं बंद करणे सीएसएमआयएच्या वार्षिक प्रतिबंधात्मक देखभालीसाठी आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखण्यासाठी आहे. या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभाल कामे करण्यात येतील. एअरमेनला नोटीस (NOTAM) एअरलाइन्स आणि इतर संबंधितांना सहा महिने अगोदर जारी करण्यात आली आहे.
बंदचं कारण काय?
मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. विमानतळ ऑपरेटरच्या निवेदनानुसार सांगण्यात आलं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 वाजता ते 17:00 वाजेपर्यंत तात्पुरते नॉन-ऑपरेशनल राहणार आहेत