देश
Marathi News LIVE Today : राष्ट्रवादी कोणाची? आज अजित पवार गटाचा युक्तिवाद संपला, शरद पवारांना पुढची तारीख प्रसिद्धी पत्रकामार्फत
राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरूवात..शरद पवार आयोगाच्या कार्यालयात उपस्थित. जितेंद्र आव्हाडही आयोगाच्या कार्यालयात.. दोन्ही गटाच्या वकिलांकडून निवडणूक आयोगासमोर कागदपत्र सादर. अजित पवार गटाकडून 1 लाख 62 हजार प्रतिज्ञापत्र सादर.
निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कुणाची याच्या सुनावणीच्या दिवशीच शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी, तसे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी द्यावेत, अशी याचिका शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात केलीय. या प्रकरणाची सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार आहे.