देश

Ganesh Visarjan Live Blog : वाजत गाजत पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी (Tambdi Jogeshwari) गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला काही वेळातच सुरुवात होणार असून लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढली जाणार असून मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज पाहायला मिळत असून पारंपारिक पद्धतीने लाडक्या बाप्पाला ढोल ताशाच्या गजरात निरोप दिला जाणार आहे.

कोल्हापुरात (Kolhapur Ganesh Visarjan 2023) देखील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झालीय. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती अग्रभागी आहे. कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, आमदार जयश्री जाधव, मनपा आयुक्त के मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची पुजा करण्यात आली आणि त्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली… पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि ढोल ताश्याच्या गजरात ही मिरवणूक सुरु झाली आहे. . गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर देखील असणार आहे.

गणेश विसर्जनासाठी अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात महापालिकेमार्फत बनवण्यात आलेल्या कृत्रिम खड्डयात विसर्जनासाठी शहरातील हजारो नागरिक येत असतात मात्र या ठिकाणी महापालिकेकडून गढूळ, दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला असल्याने भक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे या विषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हे पाणी स्वच्छ असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे त्यामुळे गणेश भक्त संताप व्यक्त करत आहे. दरम्यान या ठिकाणी आमदार रवी राणा यांनी जाऊन पाहणी केली असता दुर्गधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला असल्याचे निदर्शनाला आले आहे.

सातारा शहरातील अनेक गणेश मंडळांनी नवव्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. रात्री उशिरा पर्यंत ढोल ताशांच्या गजरात,डॉल्बी तालावर नाचत तरुणाई मोठ्या संख्येने शहरातून निघालेल्या या विसर्जन मिरवणुकीत सामील झाली होती.या विसर्जन मिरवणूक मोठा उत्साह पहायला मिळाला. काल झालेल्या आणि आज होणाऱ्या विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी या साठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.

राज्याची उपराजधानी नागपुरातही बाप्पांच्या निरोपाची तयारी पूर्ण झालीय.. शहरात 211ठिकाणी 413 विसर्जन तलाव तयार करण्यात आलेय…तर 4 फुटावरील मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था कोराडी येथे करण्यात आलीय.. शहरातील दहाही झोनमधील वेगवेगळ्या 211 विसर्जनस्थळी एकूण 413 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आलेली असून यामध्ये 19 फिरत्या विसर्जन तलावांचा देखील समावेश आहे. 4 फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कोराडी येथील विशाल कृत्रिम तलावामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे.

नाशिकच्या मालेगावमध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, शहरात तीन ठिकाणी पारंपारिक सह 10 कृत्रिम असे 13 गणेश कुंडात गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली.त्याठिकाणी होणारी पाहता पोलिसांची महापालिकेच्या मदतीने ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केले आहे. तसेच विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची तसेच लाईट व विज पुरवठा खंडित झाला तर जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.अनेक मुख्य रस्त्यावरील वाहतूकही वळविण्यात आली आहे.अपर पोलीस अधिकरी,दोन डीवायएसपी,12 पोलीस निरीक्षक,18 दुय्यम अधिकारी 200 होमगार्ड,300 पोलीस,एक राज्य राखीव दल व दोन दंगा नियंत्रण पथक मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मुख्य रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली आहे

Related Articles

Back to top button