देश

Maharashtra Rain : काळ्या ढगांचं सावट, मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या भागात कसे असतील पावसाचे तालरंग

ऑगस्ट महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात बरसण्यास सुरुवात झाली आणि अनेकजण सुखावले. 8 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या पावसानं पुढील काही दिवसांत राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोर धरला. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांसाठी असंच पर्जन्यमान राहणार असून कोकण, पालघर, ठाणे भागात मुसळधार सरींची हजेरी असणार आहे.

शनिवारपासून जोर धरलेल्या पावसानं रविवारी काही भागांमधून काढता पाय घेतला. पण, असं असलं तरीही हा पाऊस पुढील तीन ते चार दिवसांसाठी कायम असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. असं न झाल्यास पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. इथं मुंबईवर काळ्या ढगांचं सावट असलं तरीही पावसाचं प्रमाण मात्र कमीजास्त राहणार आहे. तर, शहराच्या उपनगरीय भागांमध्ये पाऊस उघडीप देताना दिसणार आहे.

Related Articles

Back to top button