देश

आरक्षणासाठी भाषण केल अन् घरी येताच…; धुळ्यात मराठा समन्वयकाचा दुर्दैवी मृत्यू

मराठा समाजाचा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आरक्षणप्रश्नी प्रत्येकवेळी राज्य सरकारकडून केवळ आश्वासनं देण्यात येत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र या आंदोलनामुळे एकाचा बळी गेलाय. धुळ्यात (Dule News) आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समन्वयकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

धुळे शहरात मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत होते. या वेळी गाजर दाखवून घोषणा देण्यात आल्या. मात्र या आंदोलनादरम्यानच धुळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजाराम पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. धुळे शहरातील जेल रोडवर गेल्या चार दिवसापासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साकळी उपोषण सुरू होते. त्या दरम्यान आंदोलन करत असताना अस्वस्थ वाटत असल्याने घरी गेलेल्या राजाराम पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

Related Articles

Back to top button