देश

Maratha Reservation Protest Live : जीआरवर ठाम: गिरीश महाजन म्हणाले जास्त ताणू नका, जरांगे म्हणाले दबाव आणू नका

जालना येथे मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यभरात बंद पुकारून आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यात (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अशातच जिथून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली त्या कोपर्डीत आजपासून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.

मराठा मोर्चाच्या वतीने मुंबई देखील आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मराठा मोर्चांवर लाठीचार्ज करण्यात आला. तसेच चंद्रकांत पाटील गेल्या वर्षपासून समितीचे अध्यक्ष आहेत. मात्र कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे या दोन नेत्यांनी राजीनामा देण्यात यावा अशी मागणी आता आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

‘मनोज जरांगे पाटील दरवर्षी आंदोलन करत असतात. जी मराठा समाजाची मागणी त्याला माझे समर्थन आहे. मी नेहमी सरकारला सांगत आलोय की आरक्षण देण्याचे पॅरामीटर्स पाळावे लागतील. पण ते प्रश्न अद्याप सुटले नाही
मराठा समाज हा मागास आहे हे जो पर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत आरक्षण देता येत नाही. अगोदर आयोगाच्या माध्यमातून समाजिक मागासलेपण सिद्ध करायला हवं,’ असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अजित पवार यांच्या गाडीखाली उडी मारून बलिदान देणार अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय पवार यांनी घेतली आहे. माझ्यासह अनेक कार्यकर्ते बलिदानाला तयार आहेत असेही संजय पवार म्हणाले. मी आधी मराठा आणि मग शिवसैनिक आहे. माझ्या बलिदानाने मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल तर मी माझा बळी द्यायला तयार आहे, असेही संजय पवार म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्याकरता यवतमाळमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान दुकाने बंद करण्यावरून आंदोलकांची व्यापाऱ्यांसोबत झटापट झाली. यवतमाळमध्ये हल्दीराम शोरूमवर दगडफेक करून काही दुकानांच्या काचा फोडल्या आहेत. मराठा कुणबी मोर्चाच्या वतीने आज यवतमाळ बंदची हाक दिली असून आंदोलक युवकांनी मोटरसायकल रॅली काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान शोरूम सुरू असल्याने आंदोलक आक्रमक झाले. यावेळी शोरूम बंद करण्यावरून वादावादी झाली आणि काहींनी दगडफेक करून शोरूमच्या काचा फोडल्या.

Related Articles

Back to top button