Buldhana Bus Accident Live Updates : नागपूरहून (Nagpur) पुण्याला (Pune) जाणाऱ्या विदर्भ बसला शुक्रवारी रात्री भीषण अपघात (Accident News) झाला. या भयानक अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 8 प्रवासी थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Buldhana Bus Accident Live Updates :झी 24 तासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी झी 24 तासाशी बोलताना अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
Buldhana Bus Accident Live Updates : विदर्भ ट्रॅव्हल्सची बस नागपूरहून पुण्याकडे जात असताना सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावानजीक समृद्धी महामार्गावर बसचा अपघात झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, बसचा टायर फुटल्यामुळं हा अपघात घडला आहे. महामार्गावर बस सर्वात आधी दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर काही अंतरावर जाऊन बस पलटी झाल्याची माहिती समोर येते. या अपघातात बसचा एक ड्रायव्हर बचावला आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बस दुभाजकाला धडकल्यानंतर बसमधील डिझेल टँकला धडक बसली त्यानंतर टँक फुटल्याने मोठा स्फोट झाला त्यातच बसने पेट घेतला.
Buldhana Bus Accident Live Updates : शुक्रवारी रात्री नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ खाजगी बसला भयानक अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार बसचे टायर फुटल्यामुळे ती खांबाला धडकून संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली. त्यानंतर ती पलटी झाली आणि तिचा काही सेकंदात आग लागली. या बसमध्ये 30 प्रवाशी असल्याचं बोलं जातं आहे. त्यातील 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने प्रवासी झोपले होते. जे प्रवासी केबीनमध्ये बसले होते ते थोडक्यात बचावले आहेत. ( Nagpur Pune Bus Accident Fire at Buldhana)
