मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात एका ऑइल टँकरला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खंड्याळ्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच…
