Search
Close this search box.

Cyclone Biporjoy मुळं समुद्रात उसळणार 3 ते 5 मीटर उंचीच्या लाटा; पाहा संपूर्ण मान्सूनसाठी High Tide चं वेळापत्रक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रावर घोंगावणाऱ्या चक्रिवादळसदृश्य वाऱ्यांनी अखेर रौद्र रुप धारण केलं आणि हवामान विभागानं या वादळाचा बिपरजॉय असं नाव दिलं. दर दिवसागणिक या वादळानं रौद्र रुप धारण केलं असून, आता चे मुंबई- महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे सरकताना दिसत आहे. असं असलं तरीही राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे स्पष्ट परिणाम दिसत असून, समुद्रही खवळल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्याच्या घडीला अरबी समुद्राला उधाण आल्यामुळं मुंबई किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं 13 जूनपर्यंत मालवण ते वसई किनारपट्टी भागात तब्बल 3.5 ते 5.1 मीटर उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. इशाऱ्याच्या धर्तीवर सध्याच्या घडीला नागरिकांना किनाऱ्यांच्या नजीक न जाण्याचा इशारा देण्यात आला आले. तर, एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचं सांगण्यात येत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें