Search
Close this search box.

Crime News: तरुणीच्या डोळ्यात घुसवला स्क्रूड्रायव्हर, नंतर ब्लेडने कापला गळा; मृतदेह पाहून पोलिसांचाही थरकाप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तेलंगणमध्ये (Telangana) एक धक्कादायक घटना घडली आहे. विकाराबाद येथे एका 19 वर्षाच्या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. अज्ञातांनी तरुणीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी सर्वात आधी तिच्या डोळ्यात स्क्रूड्रायव्हर घुसवला. नंतर ब्लेडने गळा कापत तिला ठार केलं. एका तळ्यात तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरु केला आहे.

विकाराबाद जिल्ह्यातील परिगी मंडलच्या कालापूर गावात ही घटना घडली आहे. 19 वर्षाच्या तरुणीची अत्यंत भयानक पद्दतीने हत्या करण्यात आली आहे. तलावातून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. पीडित तरुणीचं नाव जुट्टू सिरिशा आहे. आरोपींनी सर्वात आधी तिच्या डोळ्यात स्क्रूड्रायव्हरने वार केला आणि नंतर ब्लेडने गळा कापून ठार केलं.

शनिवारी रात्री घरातून निघाली होती तरुणी
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी शनिवारी रात्री 11 वाजता घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती पुन्हा घरी परतलीच नाही. याचदरम्यान तिची हत्या करण्यात आली होती. दरम्यान या हत्येमागे नेमकं कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. ग्रामस्थांनी कल्लापूर गावाजवळ तलावात तरुणीचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें