टेक्नोलॉजी

OLA स्कूटर्सची रेकॉर्डब्रेक कमाई, ३०० टक्क्यांच्या वाढीसह ३५,००० स्कूटर्सची केली विक्री

Ola Electric Scooters Sell : आता इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड आला असून ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरने देखील भारतीय बाजारपेठेत आपली हवा निर्माण केली आहे. मे २०२३ मध्ये, कंपनीने आतापर्यंत सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याचा विक्रम केला आहे. ओला इलेक्ट्रिक ओला एस1 प्रो, ओला एस1 आणि ओला एस1 एअर सारख्या A1 मालिकेतील दुचाकी विकत अलून कंपनीने मे 2023 मध्ये, तब्बल २५ हजार स्कूटर्सची विक्री करत आपलाच रेकॉर्ड मोडला आहे.

काही काळातचओला इलेक्ट्रिक कंपनीने भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केट काबीज केलं आहे. या गोष्टीवर मे २०२३ च्या विक्री अहवालाने शिक्कामोर्तब केलं आहे. कारण ओला इलेक्ट्रिकने गेल्या महिन्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ३५,००० युनिट्सच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री करण्याचा नवा विक्रम केला आहे. कंपनीने महिन्या-दर-महिना विक्रीत वाढ करत मे २०२३ च्या विक्रीदरम्यान तब्बल ३०० टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळे आता ओला इलेक्ट्रिकने बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींच्या सेगमेंटमध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण करण्यासोबतच भविष्यात आणखी आकर्षक उत्पादने आणण्यासाठी ते मार्केटमध्ये आपला पाया मजबूत करत आहेत.

काय म्हणाले भाविश अग्रवाल?
या दमदार कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना, बंगळुरू येथील ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल म्हणाले, “ग्राहकांच्या समाधानासाठी आम्ही समर्पित भावनेने काम करत आहोत. आम्ही जूनपासून आमच्या उत्पादनांच्या किमतींमध्ये किरकोळ वाढ केली आहे. सरकारने अनुदानात कपात केली असली तरी, Ola S1 ची भारतीय बाजारपेठेत बंपर विक्री होत आहे. ओला इलेक्ट्रिकने देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या अवलंबनाला प्रोत्साहन देण्याचे आपले ध्येय सुरू ठेवले आहे.”

ola इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत
१ जूनपासून ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता Ola S1 Pro ची एक्स-शोरूम किंमत १,३९,९९९ रुपये आहे, 3 KW बॅटरी पॅक व्हेरिएंटसह Ola S1 ची एक्स-शोरूम किंमत आहे १,२९,९९९ रुपये आणि Ola S1 Air. एक्स-शोरूम किंमत K 3 kWh च्या बॅटरी पॅकची किंमत १,०९,९९९ रुपये झाली आहे. ओला इलेक्ट्रिक या वर्षी ऑगस्टपर्यंत देशभरातील शोरूमची संख्या १००० पर्यंत वाढवणार आहे. ओला इलेक्ट्रिकची सध्या देशभरात ६०० केंद्रे आहेत.

Back to top button