Search
Close this search box.

बारावीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता; दहावीच्या विद्यार्थ्यांचीही प्रतीक्षा संपणार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

साधारण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच बारावी आणि मार्च महिन्यापासून इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. ज्यानंतर आता काही दिवसांची सुट्टीही शेवटच्या टप्प्यात आली आहे. पण, आता मात्र सुट्टी संपण्याच्या निराशेऐवजी विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे परीक्षांच्या निकालांकडे.

वर्षभर प्रचंड अभ्यास करून महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा ओलांडू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अवघ्या काही दिवसांतच Maharashtra State Board कडून जाहीर केलं जाणार आहे. थोडक्यात बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांसंबंधीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिची अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

सीबीएसईमागोमाग महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडूनही जाहीर केले जाणार निकाल
काही दिवसांपूर्वीच देशात सीबीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल लावण्यात आला. यामध्ये इयत्ता बारावीचा निकाल 87.88 टक्के लागला. तिथे सीबीएसईचे निकाल लागल्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या निकालांकडे पालक आणि विद्यार्थ्यांच्या नजरा वळल्या आणि आता काही दिवसांतच निकालांची तारीखही समोर आली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारावी, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीचे निकाल आता जाहीर होणार आहेत. त्यामुळं करिअरच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांवर आता या वर्गांकडून शेवटची नजर टाकली जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पुनर्मुल्यांकन आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होईल.

हॉलतिकीट तयार ठेवा आणि या लिंकही Save करून ठेवा…
इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. जिथं गेलं असता प्राथमिक माहितीचा तपशील भरून त्यांना Marksheet पाहता येईल.

admin
Author: admin

और पढ़ें