मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे रात्री 2 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महाडेश्वर यांनी 63व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. महाडेश्वरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड इथल्या राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल. गेल्या चार पाच दिवसांपासून महाडेश्वर यांची तब्येत बरी नव्हती. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील कणकवली गावाहून मुंबईत आले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा टीचर्स कॉलनी इथल्या स्मशानभूमीच्या दिशेने निघेल. 2017 ते 2019 दरम्यान विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं होते. विश्वनाथ महाडिक यांचा लग्नाच्या वाढदिवशीच निधन झाले. विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. तसेच ते स्थायी समितीचे सदस्य होते. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या.
विश्वनाथ महाडेश्वर यांचे मराठी प्रेम
मुंबईचे महापौर झाल्यानंतर प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर यांचे मराठीचे प्रेम दिसून आले. त्यांना हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलण्यास काही पत्रकारांनी सांगितले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, मी मराठीतच बोलणार. जे काही प्रश्न असतील, त्याला मराठीतच उत्तर देतील, असे ते म्हणाले. सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी भाषेतच देणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. तुम्ही मला हिंदी आणि इंग्रजीत प्रश्न विचारु शकता, पण मी मराठीतच उत्तर देईन, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. तसेच मुंबई महापालिकेच्या कामातही मराठी भाषेला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यांनी त्यांनी मुंबई महापालिकेचे कामकाज 100 टक्के मराठी भाषेत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यासाठी त्यांनी परिपत्रकही जारी करण्यात केले होते.
Live Update :
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन
वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हृदयविकाराच्या झटक्यानं महाडेश्वर यांचं निधन झाल्याची माहिती
विश्वनाथ महाडिक यांची राजकीय कारकीर्द
2002 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवड
2003 मध्ये मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड
2007 मध्ये मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले.
2012 मध्ये मुंबई महापालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले.
2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या महापौरपदी निवड