Search
Close this search box.

Crime News: अडवलं, बिअर बाटली फोडली, कपडे फाडले अन् नंतर सामूहिक बलात्कार; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पालघरमध्ये (Palghar) एका तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. आरोपीनी पीडित तरुणीच्या प्रियकराला झाडाला बांधून त्याच्या डोळ्यादेखत बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक केली असून, कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्यांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित तरुणी आपल्या प्रियकरासह संध्याकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. प्रियकर विरोध करत असल्याने त्यांनी त्याला झाडाला बांधून ठेवलं होतं. आरोपींचं वय 22 आणि 25 वर्ष आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपींना अटक करुन स्थानिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी विरारच्या साईनाथ नगरमधील निवासी आहे.

पीडित तरुणी आपल्या प्रियकरासह जवळच्या डोंगरावर फिरण्यासाठी गेली होती. आरोपींनी त्यांना पाहिलं आणि धमकावण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपी आणि तरुणामध्ये वाद झाला. तरुणाने बिअरच्या मोकळ्या बाटलीने दोन्ही आरोपींवर हल्ला केला. यानंतर आरोपींनी तरुणाचेही कपडे फाडले आणि त्याला झाडाला बांधलं असं पोलिसांनी सांगितलं आहे.

यानंतर आरोपींनी तरुणीला ओढत एका निर्जनस्थळी नेलं आणि बलात्कार केला. आरोपींनी यावेळी पीडित तरुणीची पर्स जाळून टाकली असं पोलिसांनी सांगितलं आहे. पीडित तरुणीने नंतर आरोपींच्या तावडीतून पळ काढत घर गाठलं होतं. तर तरुण मात्र झाडाला बांधलेल्या अवस्थेतच होता. तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाची सुटका केली.

admin
Author: admin

और पढ़ें