Search
Close this search box.

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर रात्रीच प्रशासनाचे आदेश, माहिम बांधकावर आता तोडक कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईत समुद्रात अनधिकृत बांधकाम करत दुसरी हाजी अली करण्याचा डाव असल्याचा व्हिडिओ दाखवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आणि रात्रीत कारवाई करण्याबाबत आदेश काढले. सकाळी 8 वाजता माहिम समुद्रातील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. त्यानंतर आज सकाळी संबंधित अधिकारी घटनास्थळी पाहणी केली. आता जिल्हाधिकाऱ्यांनी तोडक कारवाईचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात काढण्यात येणार आहेत.

माहीम समुद्रातील अनधिकृत मजारीवर कारवाई करण्यासाठी तोडकाम पथक, अधिकारी दाखल झाले आहेत. माहीमच्या समुद्रात नवं हाजी अली तयार करण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर या मजारची पाहणी करण्यासाठी अधिकारी दाखल झालेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयकडे तोडक कारवाईसाठी आवश्यक यंत्रणा नसल्याने मुंबई महापालिकेचे तोडक कारवाई करणारे कर्मचारी दर्गा परिसरात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता कधीही हातोडा पडण्याचे संकेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे तोडक कारवाईचे आदेश दिल्याने अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्याचे निर्देश दिले आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें