Pathaan OTT Released : ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री प्रदर्शित झाला ‘पठाण’
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. ‘पठाण’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच एकामागे एक रेकॉर्ड ब्रेक केले. त्याचा आजही प्रेक्षकांना क्रेझ आहे. इतकंच काय तर आजही लोक हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. चित्रपटगृहांमधून हा चित्रपट गेला नाही. आता ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा एकदा पाहायचा आहे. त्यांच्यासाठी एक महत्तावाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट आज मध्येरात्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास दोन महिन्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आज 22 मार्च रोजी ‘पठाण’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. शिवाय चित्रपटातील जे सीन्स चित्रपटगृहात पाहायला मिळाले नाही ते सगळे ओटीटीवर पाहता येणार आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी त्यावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केल्या आहेत. अनेकांनी तर कोणता सीन त्यांना चित्रपटगृहात पाहायला मिळाला नाही हे देखील सांगितले आहे.
एका नेटकऱ्यानं ट्वीट करत चित्रपटातील एक सीन शेअर केला आहे. या सीनमध्ये शाहरुख काळ्या चष्मा लावून ऑफिसमध्ये दमदार एन्ट्री घेताना दिसतो. त्यावर ही क्लिप शेअर करत नेटकऱ्यानं सवाल केला की हा सीन चित्रपटातून का काढण्यात आला? या सीनवर तर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या असत्या. दुसरा नेटकरी म्हणाला, मौसम बदल गया है! चित्रपट ओटीटीवर येताच अॅमेझॉन प्राइम क्रॅश झाला आहे.
दरम्यान, पठान चित्रपटाच्या निमित्तानं शाहरुख चार वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा आगमन केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा चित्रपट यशराज बॅनर्सच्या अंतर्गत बनवण्यात आला आहे.
बॉक्स ऑफिस कलेक्शन?
पठाणच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर हिंदी व्हर्जननं 54 दिवसात 523.15 कोटी रुपये कमावले आहेत. तर तामिळ आणि तेलुगू मिळून देशात 541.71 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. देशात ‘पठाण’चे एकूण कलेक्शन 656.50 कोटी रुपये आहे. तर पठाणच्या परदेशातील कलेक्शन विषयी बोलायचं झालं तर या चित्रपटाने 54 दिवसांत 1049 कोटींची कमाई केली आहे.