पाच मतं फुटली, एका मताने चंद्रशेखर घुलेंचा पराभव, जायंट किलर कर्डिलेंची अध्यक्ष होताच मोठी घोषणा
अहमदनगर जिल्हा बँकेवर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला दोन वेळेस चेअरमनपदाची संधी मिळाली. मधल्या काळात मी चेअरमन नव्हतो. केवळ संचालक असूनही सर्वांची कामे करीत होतो. त्यामुळेच मला पुन्हा चेअरमन होण्याची संधी मिळाली, असे मत अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे नूतन अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले. लवकरच जिल्हा बँकेत सातशे कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
बँकेच्या अध्यपदाची नुकतीच निवड झाली. कर्डिले यांनी अवघ्या एका मताने राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव केला. महाविकास आघाडीची पाच मते फुटल्याने ही निवडणूक राज्यभर गाजली. अध्यक्ष पदाचा पदभार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
कर्डिले म्हणाले, मी बँकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पॅनल मधून निवडून आलो होतो, त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक झाली. जर विश्वासात घेतले असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली. संचालक मंडळाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला चेअरमन पदाची संधी दिली. बँकेची राजकारण विरहित सुरू असलेली परंपरा अशीच सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.