iPhone 14 आणि iPhone 14 Plus नव्या रंगात लाँच, आता या कलरमध्येही मिळेल आयफोन
अॅपल कंपनीने आपल्या लेटेस्ट आयफोन सीरीज अंतर्गत iPhone 14 आणि iPhone 14 Plus ला नवीन व्हेरियंटमध्ये आणले आहे. कंपनीने या दोन्ही मॉडलला नवीन येलो कलर मध्ये लाँच केले आहे. म्हणजेच आता यूजर्सला एकूण पाच कलर ऑप्शन ध्ये या आयफोन्सला खरेदी करता येवू शकते. कंपनीने या फोनच्या कलर शिवाय, यातील फीचर मध्ये कोणताही बदल केला नाही. हाय एन्ड iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max डिव्हाइसला कोणत्याही नवीन कलर व्हेरियंट सोबत अपडेट करण्यात आले नाही. आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस आधी ब्लू, मिडनाइट, पर्पल, स्टारलाइट आणि प्रोडक्ट कलर मध्ये उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी लाँच झाली आयफोन १४ सीरीज
Apple ने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात iPhone 14 सीरीज लाँच केली आहे. आता नवीन कलर मध्ये iPhone 14 आणि iPhone 14 Plus मॉडलला उपलब्ध करण्यात आले आहे. दोन्ही मॉडलला येलो कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हे दोन फोन आधीच पाच कलर ऑप्शन मध्ये येतात. कंपनीने या दोन्ही आयफोनच्या फीचर्स मध्ये कोणतेही नवीन अपडेट केले नाहीत.
iPhone 14, iPhone 14 Plus च्या नवीन कलर व्हेरियंटची भारतातील किंमत
IPhone 14 आणि iPhone 14 Plus मॉडलला पाच कलर ऑप्शन ब्लू, मिडनाइट, पर्पल, स्टारलाइट आणि प्रोडक्ट रेड कलर मध्ये येतात. आता यात येलो कलरचा समावेश करण्यात आला आहे. हा आयफोन तीन स्टोरेज ऑप्शन १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी मध्ये येतो. आयफोन १३ ची सुरुवातीची किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे. आयफोन १४ प्लसची सुरुवातीची किंमत ८९ हजार ९०० रुपये आहे. नवीन आयफोन व्हेरियंटला १० मार्च पासून प्री ऑर्डरसाठी आणि १४ मार्च पासून खरेदी करता येवू शकते.
iPhone 14 आणि iPhone 14 Plus चे फीचर्स
iPhone 14 मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटीना XDR डिस्प्ले मिळतो. जो (1170×2532 पिक्सल) रिजॉल्यूशन आणि 460 पीपीआय सोबत येतो. तर iPhone 14 Plus मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळतो. दोन्ही आयफोनचा डिस्प्ले 1,200 निट्सच्या पीक ब्राइटनेस आणि ऑलवेज ऑन डिस्प्लेचा सपोर्ट दिला आहे. या दोन्ही फोनमध्ये ए15 बायोनिक प्रोसेसर दिला आहे. दोन्ही फोन सोबत १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आणि १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.