SSC Exam : All The Best! आजपासून दहावीची परीक्षा, केंद्रावर ‘हे’ नियम पाळा
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी दहावीची (SSC Exam) परीक्षा आजपासून (2 मार्च) सुरू होत आहे. सकाळी 11 ते 2 या दरम्यान पहिला मराठीचा पेपर घेण्यात येणार आहे. यावर्षी तब्बल 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. तसेच राज्यातील 533 परीक्षा केंद्र सज्ज असून परीक्षेची निेयोजन पूर्ण झाले आहे.
दरम्यान विद्यार्थांना बारावीप्रमाणेच दहावीला वाढीव 10 मिनिटे मिळतीलय. दहावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर नेताना जीपीएस ट्रॅकिंग केले जाईल. प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करतानाही चित्रीकरण करण्यात येईल. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला जाईल.
या नियमांचे उल्लंघन करू नका, अन्यथा…
परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे किंवा विकत घेतल्यास, तसेच मोबाईलसह अन्य इलेक्ट्र्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द होणार.
मंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लॉग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि वापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे.
परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, मिळविणे, विकणे व विकत घेणे तसेच भ्रमणध्वनी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केली तर पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे.
तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध (Rusticate) करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होणार
विषयाशी संबधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे, परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थ्यांबरोबर उत्तराच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधणे,एकमेकांचे पाहून लिहिणे, अन्य परीक्षार्थ्यांस तोंडी उत्तरे सांगणे.
मंडळाने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने, साहित्य परीक्षा दालनात स्वत:जवळ बाळगणे वापरणे.
उत्तरपत्रिकेत-पुरवणीत प्रक्षोभक,अर्वाच्च्य भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक,फोन नंबर, भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे.