Political News : अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा, दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी
अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात शिंदे गटाचे ( Shinde group) कार्यकर्ते आणि भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली. (BJP – Shinde group clashed In Ahmednagar ) यामध्ये काही नागरिकांसह दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. तर काही वाहनांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. ही घटना नगर पुणे रोडवरील केडगाव येथील रंगोली हॉटेल समोर घडली. (Maharashtra Political News in Marathi)
याप्रकरणी विठ्ठल सातपुते यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, भाजपचे शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिलेसह अज्ञात 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका लग्न समारंभात अक्षय कर्डिले आणि शिंदे गटाचे शहर ओंकार सातपुते यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. यानंतर सातपुतेंच्या मालकीचे हॉटेलवर कर्डिलेंच्या मुलाने आपल्या कार्यकर्त्यांसह येऊन तुफान दगडफेक केली.
या दगडफेकीत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हॉटेलमध्ये आलेले काही ग्राहकही जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, पोलीस तपास सुरु आहे.
शिंदे गट आणि भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर
दरम्यान, शिंदे गट आणि भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात निधी वाटपावरुन बेबनाव झालाय. यासंदर्भाचील राणा जगजितसिंह यांनी तानाजी सावंतांची प्रधान सचिवांकडे तक्रार केलीय. मंत्री तानाजी सावंतांनी मंजुरीसाठी शिफारस केलेल्या कामाच्या यादीवर आमदार राणा पाटील यांनी आक्षेप घेतलाय. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात नियमानुसार समसामान निधी वाटप करण्याची मागणी त्यांनी केलीय. मात्र सावंतांविरोधातील तक्रारीमुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.