Vani Jayaram: ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ गायिका वाणी जयराम (Vani Jayaram) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना 25 जानेवारी रोजी पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. वाणी जयराम यांचे चेन्नईमधील (Chennai) त्यांच्या राहत्या घरात निधन झाले. त्यांच्या निधनानं संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
वाणी जयराम यांनी काही दिवसांपूर्वी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये 50 वर्ष पूर्ण केले होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 10,000 जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी आरडी बर्मन, केवी महादेवन, ओपी नैय्यर आणि मदन मोहन यांसारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केलं आहे. ‘आधुनिक भारताच्या मीरा’ अशी देखील त्यांची ओळख होती.
वाणी जयराम यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी या भाषांमधील गाणी गायली. त्यांना तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि ओडिसा या राज्यांच्या राज्य पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं.