देश

क्रुरतेचा कळस! उड्डाणपुलाखाली सापडला महिलेचा लटकलेला मृतदेह

पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळील उड्डाण पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पनवेल तालुका पोलिसांनी व्यक्त केला आहे. पनवेल तालुक्यातील धामणी उड्डाण पुलाखाली असलेल्या पिलरला एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. पोलीसांनी घटनास्थळी जात मृतदेहाला बाहेर काढले. पोलिसांनी या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून आजूबाजूच्या गावातील बेपत्ता व्यक्तींची माहिती काढण्यात येते आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button