देश

China Space Station : अंतराळाचा चीन ‘बादशहा’! 6 महिन्यांनंतर 3 अंतराळवीर अखेर पृथ्वीवर

3 Chinese Astronauts Return Safely From China Space Station : जमीन आणि समुद्रासोबतच आता चीन अंतराळाचाही बादशहा झाला आहे. कायमस्वरूपी अंतराळ स्थानक बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तियांगोंग स्टेशन चीनसाठी मोठे यश मानलं जातं आहे. या वर्षाच्या अखेरीस तियांगोंगचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चीन स्वतःचे अंतराळ स्थानक असणारा जगातील पहिला देश बनेल. 6 महिन्यांनंतर 3 अंतराळवीर मोहीम यशस्वी करुन अखेर पृथ्वीवर सुखरुपरित्या परतले आहेत. 5 जून रोजी ‘शेनझोऊ-14’ यान चेन डोंग, लिऊ यांग आणि काई शुझे यांना घेऊन अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. तेथे तिघेही 183 दिवस स्पेस स्टेशन परिसरात राहून अनेक संशोधन केले.

शक्तिशाली बनण्याची स्पर्धा
चीन आणि अमेरिका यांच्यातील सर्वात शक्तिशाली बनण्याची स्पर्धा केवळ लष्कर आणि आधुनिक शस्त्रास्त्रांपुरती मर्यादित नाही. हे दोन देश अवकाशातही एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. चीनने आपल्या अंतराळ स्थानकाचं काम 2022 च्या अखेरीस पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. हे स्थानक पूर्ण झाल्यास, अंतराळ स्थानक असणारा चीन हा जगातील एकमेव देश असेल. रशियाचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हा अनेक देशांचा सहयोगी प्रकल्प आहे. चायना स्पेस स्टेशन (CSS) हे देखील रशियाने बांधलेल्या ISS चे स्पर्धक असण्याची अपेक्षा आहे.

चीनचं पुढील ध्येय
स्पेस एजन्सी तिसऱ्यांदा नवीन स्पेस स्टेशनवर क्रू आहे. यापूर्वी जूनमध्ये तीन अंतराळवीर स्टेशनवर गेले आहेत. CMSA नुसार तिसरा क्रू बांधकाम टप्प्यातील शेवटचा क्रू असेल. यानंतर, Tianzhou-6 मालवाहू जहाज आणि Shenzhou-16 स्पेसशिपचे स्वागत करून, हे क्रू देखील मे 2023 मध्ये परत येईल. चीनने 2021 ते 2022 या दरम्यान 11 वेळा अंतरीक्ष यानांना पाठवलं आहे. या स्थानकाचं आयुष्य 15 वर्षांचं गृहित धरण्यात आलं आहे. या स्थानकाला टियागॉन्ग असं नाव देण्यात आलं आहे. चीनच्या भाषेत त्याचा अर्थ ‘स्वर्गाचा महाल’ असा आहे. (China king of space After 6 months 3 astronauts finally land on Earth Trending news)

चंद्रावरही जाणार माणूस
CMSA ने घोषणा केली आहे की चीन लवकरच चंद्रावर माणूस पाठवेल. यासाठी नवीन स्पेसशिप, रॉकेट, मून लँडर आणि स्पेससूट यांसारख्या गोष्टींवर संशोधन आणि विकासाचे काम सुरू आहे.

Related Articles

Back to top button