देश

Railway Ticket Checking : राज्यात रेल्वेतून इतक्या लोकांनी केला फुकट प्रवास, दंडापोटी 218 कोटी वसूल

राज्यात (Maharashtra) फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून (Railway Travel without ticket) कोट्यवधींचा दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेनी ही कारवाई केली आहे. मुंबईसह ( Mumbai ) पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या विभागांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 218 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय. (Central Railway collects a total of Rs 218 crore as fine ) मुंबईत 13 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांकडून 77 कोटी 4 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. मुंबईतील टीसी आर.एम. गोरे यांनीच जवळपास एक कोटींचा दंड वसूल केला आहे.

रेल्वेतून विनातिकीट 32 लाख 77 लोकांचा प्रवास
रेल्वेतून विनाप्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती आकडेवाढीवरुन पुढे आली आहे. रेल्वेतून विनातिकीट प्रवास एकूण 32 लाख 77 लोकांनी केला. (Central Railway collects record-breaking Rs 218 crore in fine ) मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत लोकल आणि मेल-एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. ( Railway ticket checking ) मध्य रेल्वेच्या मुंबईसह एकूण पाच विभागात ही कारवाई केली.

या कारवाईपोटी तब्बल 218 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत मुंबई विभागात लोकलमधून 13 लाख 48 हजार लोकांनी फुकट प्रवास केला. त्यांच्याकडून 77 कोटी 4 लाख रुपये दंड वसूल केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईत 1 कोटी रुपये दंड वसूल
तसेच एप्रिल-नोव्हेंबर 2021 या कालावधीत 124 कोटी 69 लाख रुपये दंड विनातिकट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या मुंबईतील तिकीट तपासनीस आर. एम. गोरे यांनी तब्बल 11 हजार 24 लोकांना विनातिकीट पकडले. त्यांच्याकडून एक कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

दरम्यान, Central Railway ने आवाहन केले आहे. रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसे निवेदन प्रसिद्धीला दिले आहे.

Related Articles

Back to top button