देश

Mega Block News : ‘या’ मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!

मध्य रेल्वे मार्गावरील (Central Railway) 154 वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक उड्डाणपूल (Carnac Bridge) पाडण्याचं काम सुरू झालंय. त्यामुळे काल रात्री 11 वाजल्यापासून पूल पाडण्यासाठी या मेगाब्लॉकला (jumbo block) सुरूवात झाली. त्यामुळे आज सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी- वडाळादरम्यान लोकल फेऱ्या चालविण्यात येणार नाहीत. आज दुपारी 4 वाजेपर्यंत वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक (Cenrail Railway jumbo Megablock)असेल.

या मार्गावरील लोकल फेऱ्या ठप्प
कर्नाक पूल (Carnac Bridge) पाडण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर 19 नोव्हेंबर म्हणजे शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते 21 नोव्हेंबर म्हणजे सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये 36 मेल एक्स्प्रेस (express cancel) गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळादरम्यानची उपनगरीय लोकल सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. (mumbai 27 hour mega block on Central Railway route nmp)

मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकलसेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांपर्यंत चालवण्यात येतील. त्याठिकाणावरुन परतीचा प्रवास सुरु होईल. या कालावधीमध्ये भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडील लोकल गाड्यांची संख्या मात्र कमी असेल.

तर हार्बर लाईनवरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा वडाला रोड स्थानकापर्यंत असेल. त्याठिकाणावरुन लोकल परत माघारी फिरतील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे लोकल संख्या कमी संख्येने चालवल्या जातील.

ब्लॉक काळात विशेष बस सेवा
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे (central railway anil kumar) महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी गुरुवारी (17 नोव्हेंबर) अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कर्नाक उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचा आढावा घेतला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व रेल्वे अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत बेस्टतर्फे सीएसएमटी, कुलाबा, भायखळा, दादर, वडाळा आदी परिसरात विशेष बस सोडण्यात येणार आहेत.

या कामासाठी एक हजार कर्मचारी कार्यरत
350 वजनी क्षमता असलेल्या चार क्रेन, चार हायड्रामशिन, 40 गॅस कटर आणि तितकेच गॅस कटर पर्यायी म्हणून ठेवण्यात येतील. पुलावर बांधकाम विभागाचे 200 कर्मचारी आणि पुलाखाली ओएचई विभागाचे 150 आणि अन्य असे एकूण 400 कर्मचारी कार्यरत असतील. आपत्कालीन स्थितीसाठी अतिरिक्त क्रेन आणि हायड्रामशिनचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसे कर्नाक पुलाचे पाडकाम सुरू असताना सीएसएमटी ते भायखळादरम्यान शॅडो ब्लॉक घेण्यात येईल. यासाठी विविध विभागाचे एकूण एक हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. रेल्वे रूळ-स्लीपर्स बदलणे, मेल-एक्स्प्रेस फलाटांसंबंधी कामे करण्याचे नियोजन आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दोन मार्गांवर या वेळेत सेवा बंद –
सीएसएमटी ते भायखळा मार्गावर : 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 4
सीएसएमटी ते वडाळा रोड मार्गावर : 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 20 नोव्हेंबर रोजी रात्री 8
7th line आणि यार्ड: 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 2

Related Articles

Back to top button