देश

Mumbai Breaking news : मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी

आताची सर्वात मोठी बातमी….मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता आहे…मुंबईत 3 ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनावी फोन हेल्पलाइन नंबर 112 आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील इनफिनिटी मॉल अंधेरी, PVR मॉल जुहू आणि सहारा हॉटेल सांताक्रुझ हे बॉम्बने उडविणार असल्याचा दावा या निनामी फोनमध्ये करण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईत कडकोट बंदोबस्त
दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या निनावी फोनमुळे पोलिसांची झोप उडाली आहे. सहार विमानतळ पोलीस जुहू, अंबोली आणि बांगुर नगर पोलीस स्टेशन टीम, CISF आणि BDDS टीमने ताबडतोब चौकशी सुरु केली आहे. फोनवर दिलेल्या लोकेशनवर अनेक तास तपासणी केल्यानंतरही त्यांना कुठल्याही प्रकारेचे स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान हेल्पलाइन नंबर 112 वर मंगळवारी रात्री 10:30 वाजता हा फोन आला होता. पोलिसांकडून या फोन करण्याचा शोध सुरु आहे. यापूर्वीही 23 सप्टेंबरलाही असा मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन आला होता. या घटनेनंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात कडकोट बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button