देश

Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! 1 लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल? जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र सोमवारी सकाळी क्रूडच्या दरात किंचित वाढ झाली. क्रूड सध्या 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. क्रूडच्या दरात (crude prices) घसरण होऊनही देशांतर्गत बाजारात तेलाच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel ) दर जुन्याच पातळीवर कायम आहेत.

22 मे रोजी शेवटचे बदलले

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 22 मे 2022 रोजी झाला होता. त्यावेळी सरकारच्या वतीने उत्पादन शुल्कात कपात करून जनतेला मोठा दिलासा देण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण देशात एकाच वेळी किमतीत बदल झाला होता. यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये तेलाच्या किमती बदलल्या. 1 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात कपात केली.

कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि एलपीजीमधील (LPG) तोटा भरून काढण्याच्या स्थितीत पोहोचल्या आहेत. सोमवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $85.82 वर पोहोचली. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 92.15 वर दिसले. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर राज्यात पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांची कपात करण्यात आली.

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल आजचे दर

– मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
– दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
– कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
– जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
– तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
– पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
– बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
– चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
– पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे (SMS) देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर SMS करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

Related Articles

Back to top button