Search
Close this search box.

धक्कादायक! कैद्यांकडे गांजा, मोबाईल बॅटरी; Search Operation नंतर नागपूर जेल प्रशासनही हादरलं

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यात कधी, कुठे कोणता गुन्हा घडेल याचा काही नेम राहिलेला नाही. दर दिवशी समोर येणाऱ्या अशा बातम्या धक्का देत असतानाच आता नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Nagpur Central Jail) नागपूर सेंट्रल जेलमध्ये गांजा आणि मोबाईल बॅटरी मिळण्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज सकाळपासून जेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले, ज्यानंतर पोलीस प्रशासनही स्तब्ध झालं.

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे DCP चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात सुमारे 200 पोलीस कर्मचारी सेंट्रल जेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवत आहेत यामध्ये श्वानपथकाचीही त्यांना मदत होत आहे.

कारागृहात सुरु असणाऱ्या या शोधमोहिमेच्या माध्यमातून जेलमधील सर्व पुरुष बॅरॅकमध्ये कारवाई होणार आहे. काही कैदी जेलच्या आतून सर्रास मोबाईल फोनचा वापर करत असल्याचे समोर आल्यानंतर (Police) पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

सोमवारी न्यायालयातून सुनावणी पूर्ण करून पुन्हा जेलमध्ये जात असलेल्या एका सूरज कावडे नावाच्या कुख्यात गुन्हेगाराकडे 51 ग्रॅम गांजा आणि पंधरा मोबाईल बॅटरी सापडल्या होत्या. त्याच प्रकरणात तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे आज पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन सुरू केले.

बॅटरी इथे तर मोबाईल कुठे ?
मुद्दा असा, की आरकोपी सूरज याच्याकडे फक्त (Mobile Battery) मोबाईलच्या बॅटरी सापडल्या, पण मोबाईलचा काहीच पत्ता लागला नाही. पण, यावरून दोन शंकांना वाव मिळाला, एक म्हणजे एकतर जेलमध्ये मोबाईल आहेत किंवा दुसरं म्हणजे आरोपीनं बॅटरी आत नेल्या त्याप्रमाणे तो मोबाईल नेण्याचा प्रयत्नही करु शकतो.

admin
Author: admin

और पढ़ें