indiaदेश

Asia Cup 2022 : सुपर ४ सामन्यांपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे रवींद्र जडेजा स्पर्धेबाहेर

आशिया चषकात सुपर ४ च्या सामन्यांपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापत झाली आहे.

Asia Cup 2022 : आशिया चषकात सुपर ४ च्या सामन्यांपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापत झाली असून तो आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने ट्वीट करत माहिती दिली आहे. जडेजाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३५ धावांची पारी खेळत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.दरम्यान, रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला भारतीय संघात स्थान देण्यात आला आहे. आशिय चषकासाठी अक्षर पटेलला अतिरिक्त खेळाडून म्हणून स्थान देण्यात आले होते. तो लवकच दुबईसाठी रवाना होणार आहे.

जबरदस्त फॉर्ममध्ये होता रवींद्र जडेजा
आशिया चषकात रवींद्र जडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दोन षटकांत ११ धावा दिल्या ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. त्याने हार्दिक पांड्यासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला संकटातून सावरत विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवले होते. या सामन्यात त्याने क्षेत्ररक्षण करतानाही महत्त्वाची भूमिका बजावली होती. हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही जडेजाने चार षटकात केवळ १५ धावा देत एक विकेट घेतली होती.

आशिया चषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान

Related Articles

Back to top button