आठवड्याचा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत वाईट ठरला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स 872 अंकांनी घसरला, तर निफ्टीही 268 अंकांनी घसरला. सलग दोन सत्रांत शेअर बाजारात घसरण झाल्याने त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला.या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या 6.5 लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला.
तर दुसरीकडे अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेड त्याच्या व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसून येत होती. या दोन महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 45.6 लाख कोटी रुपयांची भर पडली होती. आता 6.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
