आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या चिंता वाढवत आहे. रिलायन्स उद्योग समुहामुलं जगभरातील श्रीमंतांच्या यादीत विराजमान होणाऱ्या अंबानी कुटुंबाला धोका असल्याची बाब समोर आली आहे. अंबानी कुटुंबाला पुढील तीन तासांत संपवण्याची धमकी देणारे काही फोन आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे.
प्राथमिक माहितीनुसार रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या लँडलाईनवर हे फोन आले. सात ते आठ फोन आले ज्या माध्यमातून धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तातडीने प्रकरण हाती घेत तपास सुरु केला आहे. तेव्हा आता क्रमांकाची पडताळणी होताच कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष असेल.
दरम्यान, अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारमुळंही यापूर्वी बराच तणाव निर्माण केला होता. अद्यापही या प्रकरणाच्या घडामोडी सुरु असतानाच पुन्हा एकदा अंबानी कुटुंबाला धमकावणारे फोन आल्यामुळं प्रचंड तणाव निर्माण झाला आहे
