Search
Close this search box.

‘वही राजा बनेगा जो हकदार है’; मनसे नेत्याच्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सूचक ट्वीट केलंय..अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत एक फोटोही पोस्ट केला आहे

महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता शिवसेना नक्की उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या या ट्वीटचे अनेक अर्थ आता राजकीय जाणकारांकडून काढले जात आहेत.

त्यांनी ट्वीट केले की, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा

त्यांच्या ट्वीट नंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या ट्वीटवर नेटकऱ्यांकडून असंख्य कमेंट केल्या जात आहे.

admin
Author: admin

और पढ़ें