जुहू बीचवर न्यूड होऊन धावणाऱ्या 26 वर्षीय मॉडेलचा दुर्दैवी मृत्यू
सध्या सर्वत्र अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटची जोरदार चर्चा रंगत आहे. पण न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत राहणारा रणवीर पहिला अभिनेता नाही. याआधी देखील अनेक कलाकार न्यूड फोटोशूट करत वादाच्या भोवऱ्यात अडकले. एका प्रसिद्ध मॉडेलने तर 48 वर्षांपूर्वी न्यूड फोटोशूट करत सर्वांना थक्क केलं. तेव्हा ही मॉडेल फक्त 26 वर्षांची होती. या मॉडेलचं नाव प्रोतिमा गौरी बेदी (Protima Bedi) होतं. प्रोतिमा बेदी अभिनेता किरण बेदी आणि पूजा बेदीची आई होती.
प्रोतिमाने न्यूड फोटोशूट मूव सिने ब्लिट्ज नावाच्या मॅगझिनच्या प्रमोशनसाठी होतं, मॅगझिनला नव्याने सुरू झाली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी न्यूड फोटोशूटची कल्पना ब्लिट्ज, रुसी करंजिया यांच्या डोक्यात आली आणि प्रोतिमा त्यांची कव्हर गर्लसाठी पहिली पसंती ठरल्या.
करंजियाची मुलगी रीता मेहताने सांगितलं, प्रोतिमा मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी आमची पहिली पसंती होती. मी प्रोतिमाला विचारलं मॅगझिनसाठी फोटोशूट करशील का? तेव्हा त्यांनी तात्काळ होकार दिला.
फोटोशूटसाठी सर्वप्रथम फ्लोरा फाउंटन जागा निवडण्यात आली. पण नंतर जुहू बीचवर प्रोतिमाचं न्यूड फोटोशूट करण्यात आलं. फोटोबद्दल चर्चा रंगल्यानंतर मॅगझिनची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. असं देखील रीता म्हणाल्या.
पण न्यूड फोटोशूननंतर प्रोतिमाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर प्रोतिमाने मॉडलींगला राम राम ठोकला.प्रोतिमाने नंतर बंगळुरूजवळील एका गावात 1990 मध्ये नृत्यग्राम नावाची नृत्य शाळा सुरू केली. 1998 मध्ये कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान दरड कोसळून प्रोतिमा बेदीचा दुर्दैवी मृत्यू झाला.