देश

Indore-Pune Msrtc Bus Accident : इंदूरहून पुण्याकडे येणाऱ्या एसटी बसचा अपघात, 12 जणांचा मृत्यू

इंदूरहून पुण्याला जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशच्या धारमध्ये भीषण अपघात झाला. धारमध्ये एसटी बस पुलावरून कोसळली आणि ही दुर्घटना घडली आहे.

हा भीषण अपघात होण्यामागचं नेमकं कारण समजू शकलं नाही. बस पुलावरून खाली कोसळल्याने हा अपघात झाला. ही बस इंदूरहून पुण्याला निघाली होती. 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बस एसटी महामंडळाची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात अमरावतीमध्येही भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.

Related Articles

Back to top button