देश

संसद भवन परिसरात आता निदर्शने, आंदोलनांना बंदी! खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

संसद भवन परिसरात आता खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे आदेश लोकसभा सचिवालयाने काढले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सचिवालयाने अशा प्रकारचा आदेश काढल्याने आता यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. ( Ban on MPs agitations Protests against govt in Parliament House area)

संसद भवन परिसरात आता खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे आदेश लोकसभा सचिवालयाने काढले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आंदोलन करण्याचा आधिकर संविधानमधून सगळ्यांना मिळाला आहे. लोकसभा सचिव जर आंदोलन करु देणार नसतील तर याचा जाहीर निषेध करतो. देश हा संविधानाच्या मार्गावर चालतो आहे. संसद परिसरातील गांधी पुतळ्यासमोर शांतपणे आंदोलने झाली आहेत. ते बंद करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे आणि हुकूमशाहीकडे वाटचाल आहे, अशी जोरदार टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

ससंदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारी 18 जुलैपासून सुरु होत आहे. लोकसभा सचिवालयाकडून 14 जुलै रोजी एक पत्र राज्यसभा आणि लोकसभेतील सर्व सदस्यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रात नमुद करण्यात आले की, संसद परिसरात आंदोलने, धरणं आंदोलने तसेच उपोषणासाठी आणि धार्मिक कृतीसाठी वापरता येणार नाही, यावर पूर्णपणे बंदी असेल.

दरम्यान, त्याआधी लोकसभा आणि राज्यसभेत भाषण करताना काही शब्द उच्चारण्यास खासदारांना बंदी घालण्यात आली आहे. असंसदीय शब्दांच्या यादीत आणखी काही नव्या शब्दांची भर पडलीय. भावनेच्या किंवा संतापाच्या भरात तुम्ही कुणालाही हुकूमशाह म्हणू शकणार नाही. कुणाला भ्रष्टाचारी म्हणता येणार नाही. विनाश पुरूष अशा तिखट शब्दांत कुणाची हेटाळणी करता येणार नाही.

कारण लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द आणि वाक्प्रचारांची नवी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये नवनव्या शब्दांची भर पडली आहे. कूमशाह, हुकूमशाही, जुमलाजीवी, विनाश पुरूष, शकुनी, जयचंद, भ्रष्टाचारी, तडीपार, निकम्मा, नौटंकी, खलिस्तानी, बालबुद्धी, बहिरं सरकार, काळा दिवस, कोरोना स्प्रेडर अशा अनेक शब्दांच्या वापरावर बंदी घालण्यात आलीय. त्याशिवाय चौकडी, उल्टा चोर कोतवाल को डांटे, ढिंढोरा पीटना, खून से खेती, गुंडांचं सरकार, गुंडागर्दी, चोर चोर मौसेरे भाई, गुल खिलाना, कांव-कांव करना, तलवे चाटना या हिंदी वाक्प्रचारांवरही बंदी घालण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button