संघर्ष हा आता होणारच, आम्ही कोर्टात जाणार – संजय राऊत
आता हा संघर्ष होणार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात (महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या फ्लोअर टेस्टच्या निर्णयाविरुद्ध) जाणार आहोत. आमच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयातमध्ये प्रलंबित असल्याने ही बेकायदेशीर कृती आहे, असे सांगत राज्यपाल या क्षणाचीच वाट पाहत होते, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी भाजप आणि देवेंद्र फडवणीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. त्याचवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली. आमच्या 12 आमदारांवर निर्णय घ्यायला राज्यपालांना वेळ नाही. मात्र, विश्वासदर्शक ठराव घेण्याबाबत ते तात्काळ निर्णय घेऊ शकतात. याला म्हणतात जेत स्पीड म्हणतात. हे बेकायदेशीर कृत्य आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. जनता गप्प नाही बसणार नाही. अडीच वर्षांपासूनची आमदारांच्या नियुक्तीची फाईल पडून आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.
महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांचा उद्देश सरकार पाडण्याचा होता. देशासाठी ही अत्यंत गंभीर बाब आहे. आजपासून मी बोलायचं थांबतो. मी एक कट्टर शिवसैनिक म्हणून बोलतोय. याचा त्रास होत असेल तर मी बोलत नाही. आम्ही शेवटपर्यंत लढणार, असा निर्धार संजय राऊत यांनी केला.