Search
Close this search box.

SSC Result 2022: दहावीचा निकाल जाहीर; ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) आहे. यंदा करोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत एक वेगळी उत्सुकता होती.

दरम्यान, विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाइन निकाल आज दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. राज्यातील १२,१२० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

पुढील संकेतस्थळांवर दहावीचा ऑनलाइन निकाल पाहता येईल –

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in

SSC RESULT 2022 चे सर्व ताजे अपडेट्स येथे पाहा

विभागनिहाय टक्केवारी

पुणे – ९६.९६
नागपूर – ९७
औरंगाबाद – ९६.३३
मुंबई – ९६.९४
कोल्हापूर – ९८.५०
अमरावती – ९६.८१
नाशिक – ९५.९०
लातूर – ९७.२७
कोकण – ९९.२७
एकूण – ९६.९४

admin
Author: admin

और पढ़ें