Search
Close this search box.

राज ठाकरे यांच्या वाढदिनी 54 रुपये लिटर पेट्रोल, पंपावर वाहनचालकांनी मोठी गर्दी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 54वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त औरंगाबादच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर मनसेकडून 54 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोल विक्री केली जातेय. पेट्रोलच्या दरानं शंभरी पार केली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना आजचा दिवस का होईना दिलासा देण्याचा उपक्रम मनसेकडून राबवला जातोय. 54 रुपये लिटरप्रमाणे पेट्रोल मिळत असल्यानं पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी मोठी गर्दी केलीय.

दरम्यान,  राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे मुंब्र्यात लावलेले वाढदिवसाचे बॅनर अज्ञात लोकांनी फाडले. मुंब्रा परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञात लोकांनी फाडले. या अगोदर देखील मनसे कार्यालयवरील दगडफेक करून बॅनर फाडले होते.

 

इरफान सय्यद या मनसे कार्यकर्त्याने लावण्यात आलेल्या बॅनरबाबत मुंब्रा पोलिसात तक्रार करणार आहेत. पुन्हा एकदा हा प्रकार झाल्याने मनसे नेते आणि पदाधिकारी याबाबत काय पाऊल उचलणार याकडे लक्ष लागले आहे. मुंब्रा परिसरातील नुराणी हॉटेल समोर लावलेले बॅनर फाडले.

admin
Author: admin

और पढ़ें