देश

Corona Fourth Wave : कोरोनाची चौथी लाट सुरु : WHO

सर्वांसाठीच चिंताजनक अशी बातमी आहे. ज्याची सर्वांना भिती होती तेच घडलंय. कोरोनाची चौथी लाट सुरु झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (World Helath Organisation) म्हटलंय. कोरोनाच्या नव्या छोट्या लाटेला सुरुवात झाल्याचं  WHO नं हा इशारा दिला आहे. (corona update news who world health organization chief scientist soumya swaminathan on covid fourth wave)

ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट वेगानं पसरतोय, असंही डब्लूएचओने नमूद केलंय. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत BA.4 और BA.5 व्हेरियंट वेगानं पसरतोय, असा इशारा WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी दिलाय. हीच चौथ्या लाटेची सुरुवात आहे. दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या छोट्या लाटा येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान राज्यात गेल्या 2 आठवड्यांपासून सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतेय. तसेच सर्वाधिक रुग्णांची नोंद ही मुंबईत होतेय. शुक्रवाारच्या आकडेवारीनुसार राज्यात सक्रीय रुग्णांचा आकडा हा 13  हजार पार गेला. त्यामुळे सर्वसामांन्यासह अधिकारी वर्ग आणि प्रशासनाच्या चिंतेतही वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार लवकरच काही निर्बंध लावू शकते.

 

राज्यातील कोरोनाची दैनंदिन आकडेवारी 

शुक्रवार 10 जून  : 3 हजार 81

गुरुवार 9 जून : 2 हजार 813

 

बुधवार 8 जून :  2 हजार 701

मंगळवार 7 जून : 1 हजार 881

सोमवार 6 जून :  1 हजार 36

रविवार 5 जून : 1 हजार 494

शनिवार 4 जून :  1 हजार 357

शुक्रवार 3 जून : 1 हजार 134

गुरुवार 2 जून : 1 हजार 45

बुधवार 1 जून : 1 हजार 81

Related Articles

Back to top button