अपराध समाचारदेश

पोटचा मुलगाच झाला वैरी! आई-वडिलांची हत्या केली, बहिणीला फोन करुन म्हणाला…

कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा मांडा  परिसरात वृध्द दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशोक भोसले आणि विजया भोसले अस या मृत पती पत्नीच नाव आहे.याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे पोटच्या मुलानेच आपल्या आई वडिलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हत्येप्रकरणी मुलगा अनमोल याला अटक करण्यात आलं आहे. अनमोलने चाकूने गळ्यावर वार करत आपल्या आई-वडिलांची हत्या केली. त्यानंतर तो मृतदेहाशेजारीच बसून होता.

कल्याण जवळ टिटवाळा मांडा इथल्या पंचवटी चौक साई दर्पण इमारतीत  ७० वर्षीय अशोक भोसले त्यांची पत्नी विजया भोसले ६० व त्यांचा मुलगा अनमोल ३७  असे कुटुंब राहतं. अनमोल चे लग्न झाले असून अनमोल एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. अनमोलने गुरुवारी  सायंकाळच्या सुमारास त्याच्या बहिणीला आई-वडील मयत झाल्याचे सांगत घरी बोलावून घेतलं.

 

अनमोल ची बहीण घरी आली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आई-वडिलांचा मृतदेह पाहून तिला धक्काच बसला. घरात दुर्गंधी येत होती. अनमोल त्यांच्या शेजारीच बसला होता. सगळच संशयास्पद वाटल्याने  तिने याबाबत टिटवाळा पोलिस ठाण्यात माहिती दिली .

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. या दोघांची हत्या मुलगा अनमोलने केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी अनमोलला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्यानेच चाकूने गळ्यावर वार करत या दोघांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झालं.

 

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अनमोलला अटक केली. कौटुंबिक वादातून अनमोल नैराश्य आलं होतं याच नैराश्यातून अनमोलने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्याने बुधवारी आपल्या आईवडिलांची चाकूने वार करत त्यांची हत्या केली .दिवसभर तो दोघांच्या मृतदेहासोबतच होता. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी आपल्या बहिणीला आई-वडील मयत झाल्याचे सांगितलं

अनमोल हा याआधी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात देखील राहत होता.  त्याने कोळसेवाडी पोलिसांना अनेकदा फोन करून आई वडील पैसे घेतात असे खोटेनाटे आरोप केले होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अनमोल विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

Back to top button