india

गायक सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूमुळे आईची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण, म्हणाल्या…

सिद्धू यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या आईचे एक स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंजाबसह संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धू यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या आईचे एक स्वप्न अपूर्ण राहिले आहे. जे आता कोणीही पूर्ण करु शकत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू झाला. मुसेवाला (२७) हे जवाहर के या त्यांच्या खेड्यात जीपमधून जात असताना झालेल्या AK 47 या बंदुकीने केलेल्या गोळीबारीत गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती त्यांच्या आई चरण कौर यांना समजताच त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला आहे. त्या सतत रडत आहे आणि मुलाची आठवण काढत आहे. नुकतंच सिद्धू यांच्या अचानक झाल्यामुळे त्यांच्या आईचे एक स्वप्न अर्धवट राहिले आहे. सिद्धू हा २८ वर्षांचा आहे. तो लवकरच विवाहबंधनात अडकणार होता. त्याच्या लग्नाची तयारीही तो करत होता. त्याचा प्रेमविवाह होणार होता. मात्र त्याच्या मृत्यूमुळे लग्नाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

सिद्धू मुसेवाला यांच्या आईने काही महिन्यांपूर्वी एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांना सिद्धूच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, “फक्त अजून थोडा वेळ आणि मग तो सिंगल राहणार नाही. सध्या आम्ही त्याच्या लग्नाच्या तयारी करत आहोत. त्याने स्वत:च मुलगी पसंत केली आहे. त्याच्यासोबत त्याचा साखरपुडाही झाला आहे. पण दुर्दैवाने हे स्वप्न अपूर्णच राहिले. पण आता कुणालाही इच्छा असूनही ती पूर्ण करता येणार नाही.”

दरम्यान, या घटनेनंतर पंजाब पोलिसांशिवाय हरियाणा आणि इतर राज्यांच्या पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. पोलीस पथक दोन्ही वाहनांचा शोध घेत आहे. सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button