Search
Close this search box.

“तो निर्णय वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी…”; पत्नीसाठी रोहित पवारांची भवनिक पोस्ट, कारण…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. रोहित पवार (Rohit Pawar) सोशल मीडियावरही चांगलेचं सक्रीय असतात. ते त्यांच्या कामाबद्दल, मतदारसंघातील लोकांबद्दल, आणि अन्य अनेक गोष्टींबद्दलची माहिती सोशल मीडियावरून (Social Media) सगळ्यांपर्यंत पोहचवत असतात. यासोबतच ते त्यांच्या आयुष्यातील अनेक खास दिवस, क्षणही शेअर करत असतात. अशीच त्यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे जी त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बायकोसाठी अर्थात कुंती पवार (Kunti Pawar) यांच्यासाठी लिहिली आहे.

काय आहे पोस्ट?
आपल्या सोशल मीडियावर रोहित पवार लिहतात ” प्रिय कुंती! #HappyAnniversary माझ्या आयुष्यात ज्या दोन महिलांचा प्रभाव आहे, त्यात आई आणि तू आहेस. तुझी साथ तर फार मोलाची आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात तू खंबीरपणे पाठीशी असतेस. उच्चशिक्षित असूनही स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून मुलं मोठी होईपर्यंत गृहिणी म्हणून काम करायचं तू ठरवलं.”

पुढे ते लिहतात, ” मी सार्वजनिक जीवनात असल्याने मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, म्हणून तू स्वतःहून हा निर्णय घेतलास. तो वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र किती अवघड आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच माझ्या आयुष्यात तुझं स्थान नेहमीच खास आणि विशेष असं आहे आणि ते नेहमीच तसं राहील.”

admin
Author: admin

और पढ़ें