संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेनेला इशारा, पोस्टर व्हायरल
संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना तसेच महाविकास आघाडीकडून पाठिंबा न मिळाल्याने संभाजीराजे समर्थक आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेनेला इशारा दिला आहे. याबाबतच पोस्टर व्हायरल होत आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले संभाजीराजे छत्रपती यांना कोणत्याच राजकीय पक्षाकडून पाठिंबा मिळाला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीने संभाजीराजे यांना शिल्लक मते देण्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर आपल्या विधानावर घुमजाव करत शिवसेना ज्याला पाठिंबा देईल, त्यालाच मते देण्यात येतील असे राष्ट्रवादीने जाहीर केले. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा मार्ग खडतर झाला. शिवसेनेशी संभाजीराजे यांची चर्चा सुरु होती. मात्र, शिवसेनेने शिवबंधनाची अट टाकल्यानंतर संभाजीराजे यांना ती अट मान्य नव्हती. त्यामुळे त्यांना राज्यसभेत जाण्याचा मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.
आता संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून एक फोटो व्हायरल करण्यात येतोय. या फोटोत आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार, असं लिहिले आहे. फोटोत इतिहासाची पुनरावृत्ती, राज्यात स्वराज्याची निर्मिती, आता लक्ष 2024 असं लिहिण्यात आलंय. त्यामुळे सोशलवर मीडियात संभाजीराजे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा जाहीर न केल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे आता संभाजीराजे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांना मराठा संघटनांचा (Maratha orgnisations) मोठा पाठिंबा आहे. या संघटनांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभेतील उमेदवारीसाठी अगोदरच मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे संभाजीराजे यांचे समर्थकाही प्रचंड आक्रमक झाले आहेत.
संभाजीराजे यांना पाठिंबा न देता शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरविले आहे.(Shiv Sena Rajya Sabha candidate) त्यामुळे मराठा संघटना आणि संभाजीराजे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या संभाजीराजे समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले जात आहे.
शिवसेनेने संभाजीराजे यांच्याशी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा मिळाला नाही तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरात शिरु, असा इशाराही मराठा संघटनांकडून देण्यात आला होता. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.