Search
Close this search box.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत वाढ, EDची मोठी कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ED’s big action on actress Jacqueline Fernandez : बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्यावर ईडीने कारवाई केली आहे. जॅकलिनवर ईडीची मोठी कारवाई आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीची सात कोटींहून अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने 7 कोटी रुपयांच्या भेटवस्तू आणि मालमत्ता जप्त केल्या आहेत. भेटीपोटी मिळालेल्या वस्तू या गुन्ह्यातून होत्या. या भेटवस्तू आणि मालमत्ता सुकेश चंद्रशेखर यांनी दिल्या होत्या, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

जॅकलिन फर्नांडिसने हिच्या संमतीशिवाय सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर जॅकलिन अधिक चर्चेत आली. तसेच सुकेश चंद्रशेखर याचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समावेश आहे. त्याच्याशी संलग्न मालमत्ताबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें