Search
Close this search box.

Covid-19 New Symptom: Corona च्या लक्षणांमध्ये आणखी एकाची भर, ‘या’ नव्या लक्षणानं वाढवलं टेन्शन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नवी दिल्ली, 28 एप्रिल: देशातील वाढत्या कोरोना (Corona) रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. अनेक बड्या आरोग्य तज्ज्ञांनी कोरोना मार्गदर्शक (Corona Guidelines) तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्याचा आग्रह धरला आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)वाढत्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. तरीही लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. वृत्तसंस्था ANI नुसार, दिल्लीतील अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर निखिल मोदी यांनी सांगितलं की, गेल्या 10 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे.

डॉ. मोदी म्हणाले की, बहुतांश घटनांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. सध्या, कोविड 19 च्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, शिंका येणे, घसा खवखवणे आणि खोकला यासारख्या सौम्य लक्षणांचा समावेश आहे. त्यांनी सांगितलं की, अलीकडे अतिसार हे कोविड लक्षण म्हणून पाहिलं जात आहे. संसर्ग रोखण्यासाठी सूचना करताना ते म्हणाले की, लोकांनी अनिवार्यपणे मास्क घालणं आवश्यक आहे. ते म्हणाले की, ज्या वेगानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यादृष्टीने अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे.

admin
Author: admin

और पढ़ें