india

IPL 2022 : नाव मोठं लक्षण खोटं, कोट्यवधींना रिटेन केले त्याच खेळांडूचा फ्लॉफ शो

IPL 2022 : आयपीएलचा 15 वा हंगाम आता रंगात आलाय. अनेक युवा खेळाडू चमकलेत. पण दिग्गज खेळाडूंना आपला प्रभाव पाडण्यात अयपश आलेय. विराट कोहली, रोहित शर्मापासून वेंकटेश अय्यर यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. या खेळाडूंना कोट्यवधी रुपये मोजून संघ मालकांनी रिटेन केले होते. पण ज्या खेळाडूंवर विश्वास दाखवला तेच खेळाडू सुरुवातीच्या सामन्यात अपयशी ठरल्याचं दिसत आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने सहा सामन्यात फक्त 119 धावा केल्या आहेत. विराटसाठी आरसीबीने 15 कोटी रुपये मोजले आहेत. तर मुंबईने 16 कोटी रुपये मोजलेल्या रोहित शर्मालाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.  रोहित शर्माने सात सामन्यात 114 धावा केल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्स अष्टपैलू अक्षर पटेल आणि कोलकात्याचा अष्टपैलू वेंकटेश अय्यर यांनाही आपल्या कामगिरीत सातत्या राखता आलेलं नाही. अक्षर पटेलला पाच सामन्यात फक्त एक विकेट मिळाली. अक्षर पटेलने धावाही खूप खर्च केल्या. त्याशिवाय फलंदाजीत अक्षर पटेल याला 78 धावाच करता आल्या आहेत. दिल्लीने अक्षरसाठी 9 कोटी रुपये मोजलेत. दुसरीकडे कोलकात्याचा अष्टपैलू वेंकटेश अय्यरलाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वेंकटेश अय्यरला कोलकात्याने आठ कोटी रुपयात रिटेन केले होते. पण सात सान्यात वेंकटेशला 109 धावा करता आल्यात. अब्दुल समदला हैदराबादने 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. पण समदने संघाला निराश केले. दोन सामन्यात त्याला फक्त चार धावाच करत्या आल्या. खराब कामगिरीमुळे समदला संघातून वगळण्यातही आलेय.

पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवालही कामगिरीत सातत्या राखता आले नाही. मयांकने संघाचा विश्वास सार्थ ठरवला नाही.  मयंकसाठी पंजाबने 12 कोटी रुपये मोजले आहेत. पण मयांकला पाच सामन्यात फक्त 94 धावाच काढता आल्यात. यशस्वी जयस्वालला राजस्थानने रिटेन केले होते. यशस्वी जयस्वालसाठी राजस्थानने चार कोटी रुपये खर्च केले होते. यशस्वीला तीन सामन्यात  फक्त 25 धावाच करता आल्या.  खराब कामगिरीनंतर यशस्वी जयस्वालला वगळण्यातही आलेय.

Related Articles

Back to top button