Search
Close this search box.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी खळबळजनक बातमी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाविकास आघाडीतील 18 मंत्र्यांनी कोरोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेऊन लाखोंची बिलं सरकारी तिजोरीतून भरल्याची माहिती ‘झी 24 तास’च्या हाती लागली आहे. जनता कोरोना संकटात असताना, सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी वणवण फिरत असताना 18 मंत्र्यांनी मात्र, 2 वर्षांत खासगी रुग्णालयातील उपचार घेतले.

राजकारणातील सर्वात मोठी बातमी

‘झी 24 तास’च्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीतील 18 मंत्र्यांनी कोरोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेऊन लाखोंची बिलं सरकारी तिजोरीतून भरल्याची माहिती हाती लागली आहे. जनता कोरोना संकटात असताना, सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी वणवण फिरत असताना 18 मंत्र्यांनी मात्र, 2 वर्षांत खासगी रुग्णालयातील उपचार घेतले आणि 1 कोटी 39 लाख रुपयांची बिले सरकारी तिजोरीतून दिली.

सरकारी रुग्णालयांवर भरोसा नाय का?

यामध्ये सर्वाधिक मंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत. राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी काँग्रेसच्या 6 आणि शिवसेनेच्या 3 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी तिजोरीतून पैसे खर्च केले आहेत. स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपेंचंच उपचारासाठी तब्बल 34 लाखांचं बिल झाले आहे. त्यामुळे या मंत्र्यांना सरकारी रुग्णालयांवर भरोसा नाय का असाच सवाल विचारला जात आहे.

 

खासगी रुग्णालयात उपचार घेणारे हे आघाडीवर मंत्री

– सार्वजनिक आरोग्यमंंत्री राजेश टोपे – 34 लाख 40930
– ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत – 17 लाख 630,879
– ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ-  14 लाख 56,604
– महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार – 12 लाख 56,748
– गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड – 11 लाख 76,278
– अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ -9 लाख 3,401
– पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार – 8 लाख 71,890
– जलसंपदामंत्री जयंत पाटील – 7 लाख 30,513
– उद्योगमंत्री सुभाष देसाई – 6 लाख 97,293
– परिवहनमंंत्री अनिल परब – 6 लाख 79,606

या मंत्र्यांनीही घेतले उपचार

दोन लाखांपर्यंत उपचार घेतलेल्या मंत्र्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण , पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, इतर मागासवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. तर एक लाखापर्यंत उपचार आदिवासी विकास मंत्री  के. सी. पाडवी, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी घेतलेत. तर 50 हजारच्या जवळपास राज्यमंत्री  दत्तात्रेय भरणे, ऊर्जा राज्यमंत्री  प्राजक्त तनपुरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपचार घेतले आहेत.

बॉम्बे हॉस्पिटल , लिलावती हॉस्पिटल, ब्रीच कँण्डी हॉस्पिटल ,जसलोक हॉस्पिटल ,फोर्टिस हॉस्पिटल, अवंती हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल , केईएम हॉस्पिटल ,आधार हॉस्पिटल  आदी नावाजलेल्या रुग्णालायता मंत्र्यांनी उपचार घेतल्याचे पुढे आले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें